नवी दिल्ली : फोर्ब्सने श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणे गौतम अदानी यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान पटकावला आहे. अदानी समूहाच्या अध्यक्षांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान यादीत अनेक बदल करण्यात आले आहेत. शेअर बाजारात कंपनीच्या उत्कृष्ट लिस्टिंगच्या मदतीने Nykaa च्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, स्टॉक क्रॅशमुळे पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे भारतातील टॉप १०० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

पहिले व्हिला…आता हवेली; ६ महिन्यात अंबानींनी दुबईत घेतलं दुसरं घर, दशलक्ष डॉलर्समध्ये झाला सौदा
करोनाच्या काळानंतर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे, पण या वाईटातही भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. गेल्या वर्षभरात भारताच्या शेअर बाजारात चढ-उताराचे सत्र काय आहे, पण रुपयाच्या कमकुवतपणामुळे चिंता वाढली आहे. गेल्या वर्षभरात रुपया १० टक्क्यांनी कमकुवत झाला असला तरी देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. भारतातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत २५ बिलियन डॉलरची वाढ नोंदवण्यात आली आहे आणि ती ८०० डॉलर अब्जच्या पुढे गेली आहे.

ओलाचे CEO बनू शकतात भारताचे एलोन मस्क, समोर आहेत ‘ही’ आव्हाने
अदानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतातील १०० श्रीमंतांच्या यादीत अदानी पहिल्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. अदानींची एकूण संपत्ती सुमारे १५० अब्ज डॉलर असून गेल्या एका वर्षात ती दुप्पट झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी विराजमान आहेत. या वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सुमारे ५ अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि ती ९२.७ बिलियन डॉलरवरून ८८ बिलियन डॉलरवर आली आहे. विशेष म्हणजे २०१३ पासून मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले होते, पण २०२२ मध्ये त्यांना मागे टाकत अदानी भारतातील सर्वात श्रीमंत बनले आहेत.

दरम्यान २०२२ च्या सुरुवातीला गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. अदानींच्या संपत्तीत सातत्याने वाढ होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

सिमेंटनंतर अदानींचा आता नवीन क्षेत्रात प्रवेश; आता Jio-एअरटेलशी दोन हात करणार
पाहा भारतातील टॉप-१० श्रीमंत

फोर्ब्सने जाहीर केलेल्या १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत यंदा मोठे फेरबदल झाले आहेत. यंदाच्या यादीत सावित्री जिंदाल एका स्थानाने प्रगती करत सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचवेळी हिंदुजा ब्रदर्स आणि बजाज फॅमिली या यादीत दाखल झाल्या तर दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या यादीत ८व्या क्रमांकावर असलेले उदय कोटक १२व्या स्थानावर घसरले आहेत.

१. गौतम अदानी आणि कुटुंब – १५० अब्ज डॉलर
२. मुकेश अंबानी – ८८ अब्ज डॉलर
३. राधाकृष्ण दमानी आणि कुटुंब २७.६ अब्ज डॉलर
४. सायरस पूनावाला – २१.५ अब्ज डॉलर
५. शिव नाडर – २१.४ अब्ज डॉलर
६. सावित्री जिंदाल आणि कुटुंब – १६.४ अब्ज डॉलर
७. दिलीप सांघवी आणि कुटुंब – १५.५ अब्ज डॉलर
८. हिंदुजा बंधू – १५.२ अब्ज डॉलर
९. कुमार बिर्ला – १५.२ अब्ज डॉलर
१०. बजाज कुटुंब १४.६ अब्ज डॉलर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here