सोलापूर : शहरातील गेंट्याल चौक येथे बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या चौकात डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर पोलीस पब्लिक स्कूलमधील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका निलोफर असिफ मुजावर (वय ३८, रा. सहारा नगर, सोलापूर) या शिक्षकेचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, निलोफर मुजावर या शिक्षिका शाळेतून घरी निघाल्या होत्या. मात्र गेंट्याल चौकात गेल्यानंतर निलोफर मुजावर यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. यावेळी डंपरच्या चाकाखाली चिरडून मुजावर या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अपघाताची माहिती मिळताच शाळेतील इतर शिक्षक व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!

निलोफर मुजावर या पोलीस पब्लिक स्कूलमध्ये सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होत्या. त्यांचे पती हे देखील ग्रामीण भागातील एका शाळेत शिक्षक असून त्यांना तीन अपत्य आहेत.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. सोलापूर शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here