Madhya Pradesh News: मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाला लाज आणणारा प्रकार सिंगरौलीत घडला. मृत अर्भकाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं.

मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका मागितली. बाळाला गावी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र रुग्णालयानं रुग्णवाहिका दिली नाही असा आरोप दिनेश भारती यांनी केला. यानंतर दिनेश यांनी बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. दिशेन यांनी त्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम यांना चौकशीचे आदेश दिले.
अर्भकाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याची तक्रार मिळाल्याचं सिंगरौलीचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी सांगितलं. या प्रकरणी सिंगरौलीच्या एसडीएमना तपासाचे आदेश दिले आहेत. तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.