मुंबई : यंदा धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजारात चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा असतानाच सर्वसामान्य ग्राहकांसाठीही आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या शुभमुहूर्तावर आता ते थोडे स्वस्तात सोने खरेदी करू शकतात. डॉलर निर्देशांकाच्या वाढीमुळे सराफा बाजार कमजोर होत आहे, त्यामुळे आज किंचित वाढ होऊनही सोने आणि चांदीच्या दरांत घसरत झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीतही घसरण झाली.

ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह पण सराफ बाजार सावध, जाणून घ्या काय आहे कारण
आपण फ्युचर्स मार्केटमधील आजच्या हालचालींबद्दल बोलायचे तर आज सोन्याचे वायदे ६० रुपयांनी किंवा ०.१२% कमी होऊन ५०,२५९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याची सरासरी किंमत ५०,१५३.१२ रुपये प्रति युनिट इतकी नोंदवली गेली. याशिवाय चांदीचा भाव १२६ रुपयांनी किंवा ०.२२ टक्क्यांनी वाढून ५६,१४० रुपये प्रति किलो झाला. त्याची सरासरी किंमत ५५,८२२.७४ रुपयांच्या पातळीवर होती. शेवटच्या सत्रात तो ५६,०१४ रुपयांवर बंद झाला.

दिवाळी-धनत्रयोदशीनिमित्त सोनं खरेदी करताय; फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणखी घसरले
देशांतर्गत बाजारात सोने हिरव्या रंगात चालत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस सोन्याचा भाव २१.३० किंवा १.२८६६२% च्या घसरणीसह १,६३४.२० डॉलर प्रति औंस होता. चांदीच्या फ्युचरची किंमत ०.२४१ किंवा १.२९५६९९% ने १८.३५९ डॉलर प्रति औंस झाली.

https://maharashtratimes.com/business/business-news/what-will-happen-to-your-old-jewellery-without-hallmarking-can-it-be-sold-understand-the-new-rules/articleshow/94830998.cms
मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सणांमुळे भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सोन्याचे दागिने, नाण्याची मागणी वाढली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत भारतातील दागिन्यांची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे, कारण करोनाचा प्रभाव आता जवळपास संपला आहे.

खरेदी करण्यापूर्वी शुद्धता तपासा
सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सध्या बाजारात बिनदिक्कतपणे बनावट दागिन्यांची विक्री होत आहे. याबद्दल आयएसओ लोकांना की सोने खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्क तपासण्याचा सल्ल्ला देत आहे. पण, अनेक लहान ठिकाणी अजूनही हॉलमार्कशिवाय सोनार दागिन्यांची विक्री करत आहेत. हॉलमार्कच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या आणि बनावट सोन्यात फरक करू शकता. त्यामुळे केवळ हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करावे. हॉलमार्क केलेला दागिना १८ कॅरेटचा असेल तर त्यावर ७५०, २१ कॅरेट ८७५, २३ कॅरेट ९५८ आणि २४ कॅरेट सोन्यावर ९९९ असे लिहिलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here