पुणे : यंदाच्या वर्षी पावसाने पुणेकरांना चांगलेच वेठीस धरले आहे. त्यामुळे पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर शेवळवाडी येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. याचा फटका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही सहन करावा लागला. मात्र, त्यांनी गाडीत बसून न राहता रस्त्यावर उतरुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव असतात. अनेक समस्या चांगली कामे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांचा आजचा अंदाज पाहून सोशल मीडियावर याची चांगली चर्चा रंगू लागली आहे.

शरद पवार आणि शेलारांनी संदीप पाटील यांचा घरचाच माणूस फोडला, निवडणूकीपूर्वी मोठा धक्का
सुप्रिया सुळे यांनी या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तरी अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते. याचा नागरिकांना प्रचंड त्रास न मनस्ताप होत आहे. तरी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे. कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा”, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत केली आहे.

सुप्रिया सुळे या अनेकदा नागरिकांमध्ये मिसळून त्यांची मते, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतात. वाहतूक कोंडी झाल्यानंतर त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांशी गप्पा मारत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच बस चालकांशी देखील त्यांनी संवाद साधत नागरिकांना योग्य पद्धतीने सेवा देण्याच्या सूचना केल्या.

सुप्रिया सुळे यांच्या हटके अंदाजाने रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले. रस्त्यावर उपस्थित असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वाहतुकीचा संदर्भात योग्य त्या सूचना देत वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. सुळे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यावेळी पोलीस प्रशासन देखील घटना स्थली दाखल झाले होते. त्यांनी देखील वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.

‘खरंच काम करायचंय की नाही, हे त्यांना विचारा…’; मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here