रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून रत्नागिरीचे एलसीबी पथक सध्या खेडेकर यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, यापूर्वीच खेडचे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या वैभव खेडेकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप ठेवत ६ वर्षांसाठी अपात्र करण्यात आले होते. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले होते. आता पुन्हा गणेशोत्सव स्पर्धेतील लकी ड्रॉ प्रकरणी खेडेकर यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.