Authored by विकास दळवी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Oct 2022, 3:31 pm

Hingoli News : कळमनुरी तालुक्यातल्या दाती गावाचे शेतकरी दत्तराव लक्ष्मण कदम व त्यांचा मुलगा प्रमोद कदम हे कळमनुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजमाप नोटीस बाबत माहिती घेण्यासाठी गेले होते. मोजमापाची नोटीस दाखवण्यासाठी कार्यालयातील सय्यद नावाचा कर्मचाऱ्याने एक हजार रुपये घेतल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

 

Hingoli News
Video : सरकारी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला उडवा-उडवीची उत्तरं, लेकानं इंग्रजीतच काढली खरडपट्टी

हायलाइट्स:

  • आधी वडिलांना उडवा उडवीची उत्तरं दिली
  • नंतर शेतकऱ्याच्या पोराने अधिकाऱ्याला इंग्रजीत झापलं
  • हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील प्रकार
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दाती येथील शेतकरी आपल्या मुलासह कळमनुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणीच्या नोटीसबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरे देऊन नोटीस दाबून ठेवत नोटीस दाखवण्यासाठी एका कर्मचाऱ्याने एक हजार रुपये घेतल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या प्रकारावरुन संबंधित अधिकाऱ्याला इंग्रजीत झापल्यानंतर कार्यालयात एकच भंबेरी उडाली होती. या सर्व प्रकारामुळे कळमनुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कळमनुरी तालुक्यातल्या दाती गावाचे शेतकरी दत्तराव लक्ष्मण कदम व त्यांचा मुलगा प्रमोद कदम हे कळमनुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजमाप नोटीस बाबत माहिती घेण्यासाठी गेले होते. मोजमापाची नोटीस दाखवण्यासाठी कार्यालयातील सय्यद नावाचा कर्मचाऱ्याने एक हजार रुपये घेतल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. याबाबत त्यांनी कार्यालयातील भूमी अध्यक्ष अभिलेख यांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती सांगितली. त्यांनीही असं सांगितलं की तुमची नोटीस पोस्टाने पाठवली आहे. नोटीस पाहिजे असेल तर माहितीचा अधिकार टाका असे सांगितल्यानंतर प्रमोद कदम यांनी पोस्टाने नोटीस पाठवल्याचा खुलासा मागितला त्यानंतर तेथील अधिकारी निरुउत्तर झाले.

कुठंय दिवाळी किट?, ठाकरे सेनेचा जिल्हा पुरवठा कार्यालयातच ठिय्या; आंदोलन चिघळू नये म्हणून…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून संतापलेल्या कदम यांनी थेट अधिकाऱ्यांना इंग्रजी भाषेत झापले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कार्यालयात एकच भंबेरी उडाली होती.

सुषमा अंधारेंच्या झंझावातामुळे बॅकफूटवर पडल्या, दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here