weight drought in Maharashtra | सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाहीत. परिणामी गरजू शेतकरी (Farmers) नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ जाहीर करावा.

 

Raj Thackeray Eknath Shinde
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • दिवाळसण तोंडावर असताना या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल
  • नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे आणि शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस मदत जाहीर करण्यात आलेली नाही. दिवाळसण तोंडावर असताना या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीआहे.

या पत्रात राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून आर्थिक मदतीचा आकडा अशा सर्व गोष्टींवर भाष्य केले आहे. यावर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहेत. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत पीक वाया गेले आहे. याव सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की, शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाहीत. परिणामी गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ जाहीर करावा, तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा. दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्याची अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षाने लक्ष द्यावे ही नम्र विनंती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here