सर्वेक्षण काय म्हटलंय?
केपीएमजी २०२२ इंडिया सीईओ आउटलुकच्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, भारतातील ६६ टक्के सीईओंनी पुढील १२ महिन्यांत देशात मंदी येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच जगभरातील ८६ टक्के सीईओंनी सांगितले की, पुढील एका वर्षात जग जागतिक मंदीच्या कचाट्यात येऊ शकते. या केपीएमजीच्या सर्वेक्षणात जगभरातील १३०० हून अधिक सीईओ सहभागी झाले आहेत.
मंदीचा सामना करण्यास तयार
या सर्वेक्षणात एकीकडे भारतीय सीईओंनी पुढील वर्षभरात देशात मंदी येण्याची शक्यता असल्याचे सांगितले, मात्र दुसरीकडे याचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही आवर्जून नमुद केले. ५८ टक्के सीईओंनी सांगितले की ही मंदी किरकोळ आणि अल्पकालीन असेल. त्याचवेळी ५५ टक्के कंपन्यांनी यासाठी तयारीही केल्याचे सांगितले.
संपूर्ण जगात मंदीची काय स्थिती?
जगभरातील ८६ टक्के सीईओंचा असा विश्वास आहे की पुढील एका वर्षात मंदी येऊ शकते. त्याच वेळी, ७१ टक्के लोकांच्या मते या मंदीमुळे कंपन्यांच्या कमाईवर १० टक्क्यांपर्यंत परिणाम होईल. तसेच मंदीमुळे विकासावरही परिणाम होईल, असे ७३ टक्के सीईओंचे मत आहे. मात्र, जगभरातील ७६ टक्के सीईओंनी मंदीचा सामना करण्याची तयारी केली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.