पीडित महिला वकिलाची सामाजिक संस्था आहे. लॉकडाऊनदरम्यान भोजन वितरणादरम्यान तिची सिद्धांत व अनिकेतसोबत ओळख झाली. याचदरम्यान वकिलाने स्वयंसेवकांसाठी घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. सिद्धांतही तेथे आला. जेवणावरून त्याने महिला वकिलासोबत वाद घातला. सिद्धांत याने अनिकेत यालाही बोलाविले. त्यानेही महिला वकिलासोबत वाद घातला. अन्य स्वयंसेवकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. त्यानंतर दोघेही महिला वकिलाचा पाठलाग करायला लागले. तिची छेड काढायला लागले. दोघांनी महिला वकिलाला समाजमाध्यमांवर ‘ट्रोल’ही केले. सोमवारी महिला वकील पायी जात होती. सिद्धांत , अनिकेत व त्याच्या साथीदाराने वकिलाला अडविले. तिचा हात पकडला. अॅसिड हल्ला करून ठार मारण्याची धमकी दिली व पसार झाले. यानंतर महिला वकिलाने अजनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times