मुंबई: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं. शिंदेंना ४० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे सध्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आक्रमकपणे शिंदे गटासह भाजपवर घणाघाती हल्ले चढवत आहेत. आदित्य ठाकरेदेखील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उद्धव ठाकरे वडील म्हणून कसे आहेत, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला आदित्य ठाकरेंना मनमोकळेपणानं उत्तर दिलं. त्यांनी मातोश्रीवरचे अनेक किस्सेदेखील सांगितले.

उद्धवजी अतिशय हुशार आहेत. मी कायद्याचा अभ्यास केला आहे. लॉ केलं आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर मी आणि उद्धवजी घरी डिबेट करतो. ते दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करू शकतात आणि अतिशय उत्तमपणे करू शकतात. त्यांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल खूप माहिती आहे. कोविड काळात त्यांचं ज्ञान आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे अनेकदा मी त्यांना गमतीनं म्हणतो, तुम्ही राजकारणी झाला नसता, तर कायदेतज्ज्ञ किंवा डॉक्टर झाले असतात, अशा शब्दांत आदित्य यांनी बाप-लेकाचं नातं उलगडून सांगितलं.
होय, मी मान्य करतो! ‘ती’ आमची चूक झाली!! ‘मटा कॅफे’त आदित्य ठाकरेंची स्पष्ट शब्दांत कबुली
कोविड आधी सार्कचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी सर्व महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या बैठका घेतल्या. एक इंजेक्शन देणं सोडलं तर त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड माहिती आहे. ते खूप वाचन करतात. संशोधन करतात. खूप बारकाईनं काम करण्याची त्यांची सवय आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पोह्यांवर हात ठेवून ‘त्यांनी’ शपथ घेतली! आदित्य ठाकरेंनी कोणत्या बंडखोराचा किस्सा सांगितला?
वडिलांसोबत, आजोबांसोबत मी लहानपणापासून खूप फिरलो आहे. दौरे केले आहेत. आजोबांसोबत बैठकांमध्ये सहभागी झालो आहे. त्यावेळीही माझ्या माणसाला तिकीट मिळालं नाही. दुसऱ्याच्या माणसाला दिलं, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन पदाधिकारी घेऊन घ्यायचे. त्यावेळी उद्धवजींनी मला एक गोष्ट सांगितली होती. पक्षात माझा माणूस, तुझा माणूस असं काही नसतं. सगळे आपले असतात. तिकीट देताना मेरिटवर द्यायचं. कोणी पक्षासाठी काम केलंय ते पाहायचं. त्याचा जात, धर्म पाहायचा नाही, ही शिकवण उद्धवजींना मला दिली आहे, असं आदित्य यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here