मुंबई : इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच बल्ले-बल्ले झाली आहेत. इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात १० ते १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, कंपनीतील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २० ते २५ टक्के वेतनवाढ मिळाली आहे. ही वेतनवाढ पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या श्रेणीवर अवलंबून असते. इन्फोसिसच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या पगारात फारशी वाढ झालेली नाही कारण त्यांचा पगार आधीच जास्त आहे. तसं पाहिलं तर ही दिवाळीपूर्वीच इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आहे.

Wiproनंतर Infosys कंपनीनेही दिला अनेक कर्मचाऱ्यांना दिला ‘नारळ’
मिंटच्या अहवालानुसार इन्फोसिसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मानवी संसाधनांचे समूह प्रमुख ख्रिस शंकर म्हणाले, “ते १० टक्के ते १३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. आणि काही प्रकरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना २० ते २५ टक्के दिले गेले आहेत.”

Infosysची दिवाळी भेट; प्रति शेअर बंपर लाभांश जाहीर, बायबॅक देखील मंजूर
विप्रोमध्ये १० हजारहून अधिक लोकांची वाढती
तत्पूर्वी, विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ थियरी डेलापोर्टे म्हणाले की, कंपनी आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत ८५ टक्के कर्मचार्‍यांना १०० टक्के वेरिएबल पे देईल. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की कंपनीने १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे आणि सर्व बँडच्या पगारातही वाढ केली आहे.

Infosys चे पाऊल पडते पुढे! मार्केट कॅपच्या ‘टॉप ५’ कंपन्यांत उत्तम कामगिरी, गुंतवणूकदार मालामाल
दुसरीकडे, विप्रोने सांगितले की त्यांनी या आर्थिक वर्षात १४,००० लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. कंपनीने या आर्थिक वर्षासाठी ३०,००० लोकांना कामावर घेण्याचे लक्ष्य ठेवले होते. थियरी डेलापोर्टे म्हणाले, “आम्ही H1 मध्ये १४,००० हून अधिक फ्रेशर्स समाविष्ट केले आहेत, जे गेल्या वर्षी नियुक्त केलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७२% आहे.”

कॉग्निझंटमधेही पगार वाढ
विप्रो व्यतिरिक्त आयटी क्षेत्रातील दिग्गज कॉग्निझंटनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, कॉग्निझंट कर्मचार्‍यांचे सरासरी पगार यावर्षी १० टक्क्यांनी वाढू शकतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार न्यू जर्सी-आधारित सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की त्यांना औपचारिक ई-पत्रे मिळतील. यामध्ये त्यांच्या वाढलेल्या पगाराची माहिती दिली जाणार असून हा नवा पगार ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here