नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ पोस्ट करतात. जे पाहून युजर्स आश्चर्यचकित होतात. आणि क्षणात ते व्हायरलही होताना दिसतात. अलीकडे असे अनेक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ होताना दिसत आहे.

श्रावण महिन्यात देशातील विविध शहरांमध्ये जत्रा भरविल्या जातात. यामध्ये आपल्यास अनेक उंच उंच झुले दिसतात. विविध प्रकारचे हे अनोखे पाळणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. या झुल्याचा आनंद तसा प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. कारण हा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारा ठरला असून जत्रेतील आनंदी वातावरण काही क्षणातच तणावाचे बनते, असे काय घडते?


Amit Thackeray : आता अमित ठाकरेंचे थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जत्रेच्या सुरु असून त्यामध्ये एक झुला दिसत आहे. जो एखाद्या मोठ्या बोटीसारखा दिसतो. या झुल्याच्या मालकाने जास्त पैसे कमावण्याच्या नादात क्षमतेपेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये बसवले आहेत. पण आश्चर्य म्हणजे बसायला जागा नसतानाही लोकं त्यावर उभे राहताना दिसतात. त्यामुळे या झुल्याने वेग पकडताच त्यात बसलेले लोकं झुल्यावरुन पडताना दिसले.

उद्धव ठाकरे राजकारणी झाले नसते तर…; आदित्य ठाकरे भन्नाट बोलले, मातोश्रीतले किस्से सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here