महोबा: उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये वडिलांनी दिवसाढवळ्या पिस्तुलानं मुलावर गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

लहान मुलगा सावत्र भावासोबत राहायचा. दोघांनी सोबत राहणं मला आवडायचं नाही. त्यांनी कित्येकदा समज दिली. मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. आरोपीचं नाव शिवनारायण शर्मा असून त्याला दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मोठ्या मुलाचं नाव सत्यनारायण असून दुसऱ्या पत्नीच्या लहान मुलाचं नाव सत्यदेव आहे.
मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली; ‘मॉर्निंग शिफ्ट’वाल्या टोळीचा धुमाकूळ; सावध राहा!
शिवनारायणची पहिली पत्नी माहेरी राहते. शिवनारायणनं त्याच्या पहिल्या मुलाला छिकहरा गावात सोडलं आणि दुसऱ्या पत्नीसोबत महोबातील सत्तीपुरात राहू लागला. सावत्र भाऊ असतानाही सत्यनारायण आणि सत्यदेव यांचे संबंध उत्तम आहेत. गेल्या महिन्याभरापासून दोघे एकत्र राहत आहेत.

शिवनारायण आणि त्याच्या दुसरी पत्नीला दोन भावंडांनी एकत्र राहणं पसंत नव्हतं. दोघांनी अनेकदा भावंडांना भेटण्यापासून रोखलं. मात्र ते ऐकले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या शिवनारायण यांनी मोठ्या मुलावर गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.
मंगळवारी मटण का करताय? नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण; दोघांच्या वादात शेजाऱ्याचा जीव गेला
शिवनारायणच्या गोळीबारात जखमी झालेल्या सत्यनारायण जखमी झाला. त्याच्यावर आपत्कालीन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला झाशी रुग्णालयात रेफर केलं. पोलिसांनी शिवनारायणला अटक केली आहे. त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना वैध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here