श्रीनगरः उत्तर काश्मीरमध्ये किमान ६० दहशतवादी सक्रीय आहेत. यापैकी जवळपास ४० दहशतवादी हे विदेशी आहेत. तर ७ पाकिस्तानी दहशतवादी हे एक महिन्यापूर्वी घुसखोरीने भारतात दाखल झाले आहेत. यानंतर ते उत्तर काश्मीरमध्ये सक्रिय झाले आहेत. यामुळे सुरक्षा दलांनी आता या दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी मोहीम उघडली आहे. यानुसार सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सोमवारी दहशतवादी उस्मान कमांडर याच्यासह त्याचा साथीदार ठार झाला. उत्तर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम उघडली आहे. या भागातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. यामुळे या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

उत्तर काश्मीर भागात दहशतवादाशी संबंधित अनेक घटना घडत आहेत. दहशतवाद्यांनी एका नेत्याची हत्या केली आहे. तसंच नागरिकांना धमकावलं जात आहे. तर अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. यामुळे सुरक्षा दलांनी आता उत्तर काश्मीरवर आपला पूर्ण फोकस केला आहे. या भागाला दहशतवादी आपला किल्ला बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण सुरक्षा दलांनी त्यांचा सफाया करण्यासाठी तयारी केली आहे.

उत्तर काश्मीरमध्ये ६० दहशतवादी आहेत. यापैकी ४० दहशतवादी हे विदेशी आहेत. तर विदेशी दहशतवादी एका महिन्यापूर्वी घुसखोरी करून काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या वर्षी दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या स्थानिक तरुणांपैकी बहुतेक सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेले आहेत. तर काही पकडले गेले आहेत. या वर्षी आतापर्यंत किमान १२ तरुणांना दहशतवादी होण्यापासून वाचवले आहे. पोलीस या भागात अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नागरिकही आता दहशतवाद्यांना मदत करत नाही

अनेक भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यासह नियोजित गस्त, महामार्गांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे दहशतवाद्यांची माहिती मिळताच लगेच बंदोबस्त करता येऊ शकणार आहे. या भागातील अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत. आता भागावर अधिक फोकस करण्यात आला आहे, असं विभागाचे डीआयजी महमद सुलेमान चौधरी यांनी सांगितलं. दहशतवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सूत्रांना कामाला लावलं आहे. या भागात आता नागरिकही दहशतवाद्यांना मदत करत नाहीए.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here