मुंबई: सोशल मीडिया पोस्टमुळे एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मैत्रिणीसोबतचा फोटो वांद्र्यात राहणाऱ्या २७ वर्षांच्या हॉटेल व्यावसायिक तरुणानं सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे मैत्रिणीचा जुना प्रियकर भडकला. त्यानं तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला. तो आता कधीही पूर्ववत होऊ शकणार नाही.

मोहम्मद नावेद खान नावाचा तरुण वांद्रे पश्चिमेला तवा मिस्टरी नावाचं हॉटेल चालवतो. त्यानं त्याची मैत्रीण निकितासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला. त्यानं फोटोत निकिताला टॅग केलं होतं. त्यामुळे ही स्टोरी निकिताच्या संपर्क यादीत असलेल्यांनादेखील दिसत होती.
मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली; ‘मॉर्निंग शिफ्ट’वाल्या टोळीचा धुमाकूळ; सावध राहा!
मी फोटो पोस्ट केल्यानंतर साकिब नावाच्या व्यक्तीकडून मला फोन येऊ लागले. निकितापासून दूर राहा अशा शब्दांत त्यानं मला धमकावलं, असं मोहम्मद नावेद खाननं सांगितलं. तो वांद्रे पश्चिम येथील मरियन हाऊसचा रहिवासी आहे. साकिबनं मोहम्मदला त्याच्या एका मित्राच्या (अब्बास) माध्यमातूनही धमकावलं. त्यानंतर मोहम्मदनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

मंगळवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास खान अब्बासला भेटला. त्यानं त्याला घरी सोडलं आणि साडे आठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला. खान लिलावती रुग्णालयाजवळ असलेल्या हायवेवर पोहोचला. त्यावेळी साकिब त्याच्या मित्रांसह तिथे आला. ‘एमईटी जंक्शनजवळ माझी दुचाकी घसरली. मला कोणत्याही प्रकारची मारामारी नको, असं मी साकिबला सांगितलं. मात्र साकिब आणि त्याच्या मित्रांनी माझ्यावर लोखंडी काठ्यांनी हल्ला केला,’ असं खाननं सांगितलं.
मंगळवारी मटण का करताय? नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण; दोघांच्या वादात शेजाऱ्याचा जीव गेला
साकिबनं तोंडावर मारल्यानंतर मी खाली कोसळलो. मी जेव्हा उठलो, तेव्हा मला नीटस ऐकू येत नव्हतं, अशी माहिती खाननं दिली. थोड्याच वेळात साकिब आणि त्याचे मित्र तिथून पळून गेले. त्यानंतर मी जवळच राहणाऱ्या माझ्या मित्राला कॉल केला. तो मला भाभा रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी मला तपासलं. माझा डाव्या कानाचा पडदा कायमचा फाटला असल्याचं त्यांनी सांगितलं, असं खान म्हणाले. पोलिसांनी साकिबला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here