नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, प्रेयसीला भेटायला जाणं एका प्रियकराच्या जीवावर बेतलं आहे. ते म्हणतात ना ‘ये इश्क नही आसान,’ तशीच काही घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका विवाहित प्रेयसीला तिच्या नवऱ्याशी लपून भेटायला गेलेल्या प्रियकराला बाल्कनीतून उडी घेणं महागात पडलं. प्रियकराने प्रेयसीच्या पतीला पाहताच थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन प्रेमाचे भांडे फुटेल म्हणून उडी घेतली आणि यात त्याचा मृत्यू झाला.

खरंतर आज पर्यंत प्रेमात जीव दिला किंवा जीव घेतला अशा अनेक घटना आपण बघितल्याच असतील. अशीच काहीशी आहे नाशिकमधील ही घटना. हिरावाडीत राहणारा एक ३६ वर्षीय युवकाचे म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. हा युवक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. मात्र, त्याचवेळी तिच्या पतीने दोघांना बघितलं. अशात आता आपलं भांड फुटणार अशी भीती प्रियकराच्या मनात निर्माण झाली. प्रेयसीच्या पतीने त्याला विचारपूस केली असता त्याने भीतीपोटी थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली.

अंधेरीच्या निवडणुकीत २०२४ मध्ये काय होईल ते दिसेलच, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
या घटनेत तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे थेट तिसऱ्या मजल्यावरून मारलेली उडी त्याची शेवटची उडी ठरली. तर याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रेम जेवढं साधं, सरळ, सोप्प अगदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मनाला आनंद देऊन जाणार असतं तसंच त्याचा असा शेवट झालेले ही अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत.

प्रेमासाठी कुटुंबीयांचा विरोध असणं, पळून जाऊन लग्न करणं आणि पळून गेल्यावर हे कधीकधी ‘सैराट’ प्रमाणे त्या प्रेमाचा अंत होणं, कधी ‘एकमेकांचे नाही होऊ शकलो तर कोणाचेच होणार नाही,’ म्हणून आत्महत्या करणं असे कितीतरी उदाहरण देता येतील आणि त्याच उदाहरणांमध्ये आता नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेचा देखील उदाहरण असेल. प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या प्रियकराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली.

निकितापासून लांब राहा! इन्स्टा स्टोरीवरून वाद, एक्सची तरुणाला जबर मारहाण, कानाचा पडदा फाटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here