पुणे : आई आपल्या मुलासाठी काय करू शकते याच ज्वलंत उदाहरण बारामतीत पाहायला मिळालं आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असतानाही चक्क १५ लाख रुपयांची जमवा जमव करुन तिने ऐन तारुण्यात आलेल्या मुलाची आजारातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नियतीला मान्य नव्हतं, आपल्या पतीच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या अंतरावरच आपल्या एकुलता एक मुलाचं निधन झाल्यानं शालनबाई शिवाजी वाईकर या ६० वर्षीय वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शालनबाई वाईकर या वृद्ध आई समोर सून व तीन नातवंडांचा संभाळ कसा करावा असा पेच निर्माण झाला आहे.

शालनबाई वाईकर यांचे पती शिवाजी वाईकर यांचे मागील सहा महिन्यांपूर्वीच लिव्हर निकामी झाल्याने निधन झाले. दरम्यान, त्यांचा मुलगा रविराज यालाही लिव्हरचा असह्य त्रास होऊ लागला. शालनबाई यांनी पतीनंतर कर्ता पुरुष असलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाला स्वतःची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही दवाखान्यासाठी समाजाकडून दोन लाख रुपये रुपये आर्थिक मदत गोळा केली. बारामतीसह पुण्यातील विविध रुग्णालयात रविराजवर उपचार सुरु केले. रविराजच्या उपचारावर दररोजचा ७० ते ८० हजार रुपये खर्च करण्यात आला. तब्बल १५ लाख रुपये खर्च करुन ही रविराजचा जीव वाचू शकला नाही.

भारतीयांनो सावध व्हा! नव्या संकटाची देशात एन्ट्री, यावर उपायही नाही; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
शालनबाई वाईकर या जोशी समाजाच्या असून, ते पालावर राहतात. दिवसभर भटकंती करुन ते आपली उपजीविका चालवतात. पती व मुलाच्या उपचारासाठी नात्यातील व ओळखीच्या लोकांकडून १५ लाख रुपये घेतले होते. हे पैसे कसे परत करावे. तसेच नातवंडांचा संभाळ कसा करावा या विवंचनेत सध्या शालनबाई आहेत.

लिव्हर आजाराने ग्रस्त असलेल्या रविराज वायकरचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी पतीच छत्र हरवलं तर आता तरुण मुलाला गमावण्याची वेळ आईवर आलेली आहे. मुलगा आणि पती गेल्याने सून आणि नातवंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शालनबाई शिवाजी वायकर यांच्यावर आली आहे. जवळचा सर्व पैसा उपचारावर खर्च झाला. उर्वरित बिलाच्या कारणास्तव बील कसे भरायचे, असा पेच निर्माण झाला होता. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सदर रुग्णालयाचे बिल भरले.

मोठी बातमी, लिझ ट्रस यांचा धक्कादायक निर्णय, ४५ दिवसात ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here