Saral Pension Yojana : करोनाचं जीवघेणं संकट पाहिल्यानंतर आता सगळेच जण गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळले आहेत. अशात आम्ही तुम्हाला एक उत्तम योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळवू शकता. तुम्हालाही सुरक्षित आणि फायदेशीर योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत तुम्ही ६० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत पेन्शन मिळतं असं ऐकलं असेल. पण आता पेन्शनसाठी इतकी वाट पाहावी लागणार नाही.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने एक उत्तम योजना लाँच केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करून वयाच्या ४० व्या वर्षीही पेन्शन मिळू शकतं. काय आहे ही योजना? जाणून घेऊयात.

भारतीयांनो सावध व्हा! नव्या संकटाची देशात एन्ट्री, यावर उपायही नाही; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
काय आहे सरल पेन्शन योजना?

LIC च्या या योजनेचे नाव सरल पेन्शन (Saral Pension) आहे जी एकल प्रिमियम पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये प्रिमियम फक्त पॉलिसी घेताना भरावा लागतो. यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. इतकंच नाहीतर पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर एकल प्रिमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागतं. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते.

ही पेन्शन योजना घेण्याचे दोन मार्ग आहेत…

सिंगल लाईफ – यामध्ये पॉलिसी कोणा एकाच्या नावावर असेल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रिमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

दोन बायकांच्या नादात कल्याणच्या तरुणाचं धक्कादायक कृत्य, तपास करताच पोलीसही हादरले
जॉइंट लाइफ – यामध्ये दोन्ही जोडीदारांना कव्हरेज असतं. जोपर्यंत प्राथमिक निवृत्तीवेतनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना निवृत्ती वेतन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाईल.

कोण घेऊ शकतं सरल पेन्शन योजना?

या योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा ४० वर्षे आणि कमाल ८० वर्षे आहे. ही संपूर्ण आयुष्य पॉलिसी असल्याने, पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन मिळेल. सरल पेन्शन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

कधी मिळणार पेन्शन ?

हे पेन्शनधारकांनी ठरवायचं आहे. यामध्ये तुम्हाला ४ पर्याय मिळतात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर ६ महिन्यांनी पेन्शन घेऊ शकता किंवा १२ महिन्यांनी घेऊ शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडाल, त्या कालावधीत तुमची पेन्शन येण्यास सुरुवात होईल.

किती पेन्शन मिळणार?

या सरल पेन्शन योजनेसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील. याचा विचार केला तर जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये पेन्शन, तीन महिन्यांसाठी ३००० रुपये, ६ महिन्यांसाठी ६००० रुपये आणि १२ महिन्यांसाठी १२००० रुपये मिळतील.

तुम्ही ४० वर्षांचे असाल आणि तुम्ही १० लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला असेल, तर तुम्हाला वार्षिक ५०२५० रुपये मिळू लागतील. तेही कायमस्वरुपी. इतकंच नाहीतर, जर तुम्हाला तुमची जमा केलेली रक्कम मध्येच परत हवी असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला ५ टक्के वजा करून जमा केलेली रक्कम परत मिळते.

चंद्राने पृथ्वीचं टेन्शन वाढवलं! शास्त्रज्ञांनाही सतावतेय चिंता; वाचा आपल्यावर काय होणार परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here