म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखताना नाकीनऊ येत असतानाच, दुसरीकडे मुंबईकरांकडून करण्याचा सिलसिलाही कायम आहे. सुरक्षित वावर न पाळणे, गर्दीचा भाग होणे, मास्क न वापरणे, संचारबंदीचे उल्लंघन आदी गुन्हे करण्यात मुंबईकर आघाडीवर आहेत. त्यामुळेच लॉकडाउन जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत नियमभंग करणाऱ्या सुमारे ३२ हजार ६६१ मुंबईकरांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मधल्या कालावधीत लॉकडाउन शिथिल झाल्याने कारवाईचे प्रमाण कमी झाले. मात्र पोलिसांनी दोन किमीपर्यंतच वाहनांना मर्यादित ठेवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याने वाहनचालकांवरील कारवाईचे प्रमाण प्रचंड वाढले. पोलिसांची कारवाई वादाच्या भोवऱ्यात पडल्यानंतर राजकीय हस्तक्षेपानंतर ती मागे घेण्यात आली. असे असले तरीही नियमभंग करणाऱ्यांची संख्या काही कमी झाली नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असतानाही अनेक मुंबईकर मास्क न वापरणे, गर्दीत वावरणे, खरेदी करताना सुरक्षित वावर न ठेवणे आदी नियमभंगात व्यग्र आहेत. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण कालावधीत पाहिजे आरोपी चार हजार ७३१ असून, नोटीस देऊन सोडण्यात आलेले ११ हजार ३६ जण आहेत. तर अटक करून जामिनावर सोडलेले १६ हजार ८९४ इतके जण आहे.

पोलिसांनी शनिवार आणि रविवारी मिळून दोन हजारांवर गुन्हे नोंदवले आहेत. त्यात रविवारी एक हजार ११४ जणांविरोधात गुन्हे असून, अटक करून जामिनावर सोडलेल्यांची संख्या ३२७ आहे. सोमवारी, गुन्हे नोंदवलेल्यांची संख्या एक हजार १११ असून जामिनावर सोडलेल्यांची संख्या २८१ इतकी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here