तसेच आज चिपळूण पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याच बरोबर आठ संशयितांचे जबाब घेण्यात आले. तर कॉल डेटा रेकॉर्डही (सीडीआर) मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिसरातील पेट्रोल पंप, हॉटेल या ठिकाणचे सीसीटी व्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लवकच लागणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
चिपळुणात श्वान पथक दाखल
गुरुवारी रात्री चिपळुणात श्वान पथक दाखल झाले. ते याच परिसरात घुटमळले. काही ठसेदेखील पोलिसांनी घेतले आहेत.तपासाच्या कामासाठी सात पथके तयार केली आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, चार उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूणमध्ये फौजफाट्यासह ठाण मांडून आहेत. खेड, रत्नागिरी, दापोली येथील पोलिस अधिकारी चिपळुणात कार्यरत आहेत.
आमदार भास्कर जाधव यांच्या घरासमोरील तसेच पाग परिसर, बाजारपेठ या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. संशयितांचे मोबाईल देखील तपासले जाणार आहेत. घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times