नवी दिल्लीः राजस्थानमधील बंडखोर नेते यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. प्रदेशाध्यक्ष पदासह उपमुख्यमंत्री पदावरून त्यांची काँग्रेसने हकालपट्टी केली. सत्य पराभूत होऊ शकत नाही, असं म्हणत सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या कारवाईला उत्तरही दिलंय. सचिन पायलट हे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार होते. पण नंतर ही पत्रकार परिषद रद्द करून बुधवारी दिल्लीत घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. आता सचिन पायलट हे आज मौन सोडणार आहेत.

काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी आतापर्यंत जाहीरपणे एकही वक्तव्य किंवा टीका केलेली नाही. पण गहलोत गट सचिन पायलट यांना बदनाम करण्यात व्यग्र आहे, असा आरोप सचिन पायलट यांच्या गटाकडून होतोय. खरं तर सचिन पायलट हे आतापर्यंत शांत दिसून आलेत. काँग्रेसने पदावरून हकालपट्टी केल्यानंतर सत्याचा छळ होऊ शकतो पण ते पराभूत होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवरून दिलीय. यासह त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून काँग्रेस हटवले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार एवढेच ठेवले आहे. दुसरीकडे सचिन पायलट यांनी पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

पाठिंबा देणाऱ्यांचे आभार

सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील काही तरुण नेत्यांनी या कारवाईवर जाहीपणे मत व्यक्त केलं आहे. मुंबईती माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त आणि जितीन प्रसाद यांनी सचिन पायलटवरील कारवाई खेदजनक असल्याचं म्हटलं आहे. यावर सचिन पायलट यांनी ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. ‘काहींनी आपल्याला जाहीरपणे समर्थन दिले. या सर्वांचे खूप खूप आभार. राम राम सा’, असं ट्विट सचिन पायलट यांनी केलंय.

भाजपची सकाळी ११ वाजता बैठक

राजस्थानमध्ये काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीने राजकारण ढवळून निघालं आहे. आतापर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडींत कुठेही प्रत्यक्षपणे नसलेली भाजप आता मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भाजपने आज जयपूरमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे याही उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विद्यमान राजकीय स्थितीवर या बैठकीत भाजप नेत्यांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर आता या पुढील दिशा भाजप ठरवणार आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने सकाळीच वरिष्ठ नेते ओम माथुर यांना जयपूरला पाठवले आहे. तेही उद्याच्या बैठकी सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here