Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Oct 2022, 9:29 am
MIT student end his life | जॉर्डन पब्लिसीयेस हा पूर्व हावेलीतील एमआयटी शैक्षणिक संकुलात, डिझाइन विभागामध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. विद्यापीठात जॉर्डन हा अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. सहा महिन्यांपूर्वी त्याला परदेशात जाण्याची संधीदेखील प्राप्त झाली होती. सध्या एमआयटीच्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. दिवाळीनिमित्त सगळे विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. जॉर्डनही त्याच्या बंगुळुरु येथील घरी जाणार होता.

हायलाइट्स:
- वसतीगृहाच्या वॉर्डनकडून रुमची नेहमीप्रमाणे तपासणी सुरु होती
- जॉर्डनच्या खोलीजवळ आल्यानंतर त्याचा दरवाजा बंद असलेला दिसला
जॉर्डन पब्लिसीयेस हा पूर्व हावेलीतील एमआयटी शैक्षणिक संकुलात, डिझाइन विभागामध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. विद्यापीठात जॉर्डन हा अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. सहा महिन्यांपूर्वी त्याला परदेशात जाण्याची संधीदेखील प्राप्त झाली होती. सध्या एमआयटीच्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. दिवाळीनिमित्त सगळे विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. जॉर्डनही त्याच्या बंगुळुरु येथील घरी जाणार होता. त्यासाठी जॉर्डनने ट्रेनचे तिकीटही बूक केले होते. सगळे विद्यार्थी आपल्या आपल्या गावी जात असल्याने वसतीगृहाच्या वॉर्डनकडून रुमची नेहमीप्रमाणे तपासणी सुरु होती.
जॉर्डनच्या खोलीजवळ आल्यानंतर त्याचा दरवाजा बंद असलेला दिसला. बराचवेळ दरवाजा वाजवूनही आतून कोणीही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे वसतीगृहाच्या खिडकीतून आतमध्ये पाहिले. तेव्हा जॉर्डन पब्लिसीयेसने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची वर्दी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जॉर्डनचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी जॉर्डनच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्याची चौकशी केली. जॉर्डन सिलेक्शन न झाल्यामुळे दोन दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती त्याच्या रुम पार्टनरने दिली. दोन दिवसांपूर्वीच जॉर्डनचा रुम पार्टनर गावी निघून गेला होता. यानंतर पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून जॉर्डनचा मोबाईल तपासला. तेव्हा जॉर्डन आणि एका तरुणीमधील व्हॉटसअॅप संभाषण पोलिसांच्या हाती लागले आहे. जॉर्डनने आत्महत्या करण्याच्या दोन तास आधी म्हणजे दुपारी अडीचच्या सुमारास दोघांमध्ये ४० मिनिटं व्हॉटसअॅपवरून संभाषण सुरु होते. यानंतर दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने जॉर्डनने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. जॉर्डनने या तरुणाला, ‘तू मला आयुष्यभर साथ देशील का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर तरुणीने नाही, असे म्हटले. यावर जॉर्डनने ‘तू आता एकटीच राहशील’, असा मेसेज पाठवत संभाषण थांबवले. त्यानंतर या तरुणीने पाच वाजेपर्यंत जॉर्डनला अनेकदा फोनही केले. मात्र, जॉर्डनने फोन उचलला नाही. यानंतर जॉर्डनने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांकडून सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.