मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची वाटचाल मजबूत दिसत आहे. जागतिक निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास काल अमेरिकी बाजारांमध्ये घसरण दिसून आली आणि डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि S&P ५०० निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. आज बाजाराच्या सुरुवातीला आशियाई बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत आणि SGX निफ्टी हिरव्या चिन्हाने व्यवहार करताना दिसत आहे. बँक निफ्टीला बाजाराला पाठिंबा मिळाला असून अॅक्सिस बँकेचे शेअर्स सुरुवातीला ४ टक्क्यांनी वाढले आहेत.

बाजाराची सुरुवात कशी झाली?
आज व्यवहाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स १७८.४६ अंकांच्या म्हणजेच ०.३० टक्क्यांच्या वाढीसह ५९,३८१.३५ वर उघडला. याशिवाय, एनएसईचा निफ्टी ५८.९० अंक किंवा ०.३४ टक्क्यांच्या उसळीसह १७,६२२ वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

IT कर्मचाऱ्यांची दिवाळी! इन्फोसिसने पगारात २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली, तर विप्रोने…
प्री-ओपनमध्ये मार्केटची चाल
आज शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात बाजारात हिरवाई दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स १३७ अंकांच्या किंवा ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह ५९,३४० च्या पातळीवर दिसला. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी २९ अंकांच्या किंवा ०.१७ टक्क्यांच्या वाढीसह १७,५९३ च्या स्तरावर व्यवहार करत आहे.

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय, गुंतवणूकदार याला का शुभ मानतात?
आज देशांतर्गत बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल आहे. तर गुरुवारी ट्रेझरी यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे अमेरिकन बाजारांवरही दबाव होता. ब्रेंट क्रूड किरकोळ वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड प्रति बॅरल ९३डॉलर वर व्यवहार करत आहे. तर यूएस क्रूड प्रति बॅरल ८५ डॉलरवर व्यापार करत आहे. अमेरिकेत १० वर्षांचे रोखे उत्पन्न ४.२४२ टक्के आहे. दुसरीकडे, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी जागतिक बाजारात मंदी दिसली. मजबूत सुरुवातीनंतर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकन बाजार घसरले.

‘या’ IPO ची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदारांनी आता कोणती रणनीती आखावी
कोणते शेअर्स पडले
सेन्सेक्समधील ३० पैकी ७ समभाग घसरले असून यामध्ये टेक महिंद्रा, आयटीसी, एचसीएल टेक, एचडीएफसी, टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, भारती एअरटेल यांचे समभाग घसरत आहेत.

कोणते शेअर्स वधारले
आज सेन्सेक्समधील ३० पैकी २३ शेअर्स उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. अॅक्सिस बँक जवळपास ६ टक्क्यांच्या वर दिसत आहे. याशिवाय टायटन, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय आणि सन फार्मा, एमअँडएम यांच्या शेअर्समध्येही उसळी दिसून येत आहे. याशिवाय इतर वाढत्या समभागांमध्ये नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, L&T, मारुती, विप्रो, आयटीसी, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे समभागही वधारताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here