नेमका काय आहे एसटी महामंडळाचा निर्णय?
एसटी महामंडळाकडून साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. ज्या प्रवाशांनी एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केलं आहे , त्या प्रवाशांकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दिवाळीत एसटी महामंडळ अतिरिक्त गाड्या सोडणार
दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबीय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबरते ३१ ऑक्टोबर या दरम्यान अतिरिक्त गाड्या धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.