अहमदनगर : अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मोठ्या कष्ट्याने वाढवलेली पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली गेली आहेत. मात्र या पावसाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसला, असं नाही. कोपरगाव तालुक्यात याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. टाकळी रस्त्यालगत काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कांदा साठवून ठेवला होता. बुधवारी मध्यरात्री कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्यामुळे या शेडमधील व्यापाऱ्यांचा कांदा पाण्यात वाहून गेला. परिणामी व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं.

पाण्याचा प्रवाह थांबल्यावर उरलेला कांदा पाण्यावर तरंगत होता. भिजलेला हा कांदा वाया गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं. यामुळे गुरूवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलावही बंद ठेवण्यात आले होते.

एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; भाडेवाढीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी

टाकळी रोडवरील या व्यापाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचाही तडाखा बसला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा वाहून गेला होता. आता पुन्हा या कांदा व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा वाहून गेला. तसंच सततच्या पाण्यामुळे साठवून ठेवलेला कांदा सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे कसे द्यायचे, अशी चिंता आता या व्यापाऱ्यांना सतावत आहे. काहींनी स्वतःचे पैसे उपलब्ध करून शेतकऱ्यांना बिले दिली. मात्र त्यांचा कांदा वाहून गेल्याने तोटा झाला आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या संकटामुळे व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे.

Hingoli : ऐन दिवाळीत पाऊस, आसना नदीला पूर आल्याने हिंगोलीत शेकडो एकर शेती पुराच्या पाण्यात

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी गुरूवारी सकाळी या नुकसानीची पाहणी केली आणि सर्व कांदा व्यापाऱ्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी तहसीलदार विजय बोरूडे यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या. कोल्हे म्हणाले, बुधवारी पहाटे मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे मध्यरात्री आलेल्या पाण्यामुळे काहीच कळले नाही. नैसर्गिक संकट भयावह आहे. यापूर्वी एवढ्या मोठया प्रमाणात पाऊस कोसळला नाही. विजेचा कडकडाट प्रचंड होता. या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून त्यांना धीर देऊन प्रशासकीय पातळीवर या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. संजीवनी आपत्ती व्यवस्थापन केंद्रामार्फत मदतकार्य सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here