मुंबई: चर्चगेट येथील इमारतीला लागली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाचे पाच बंब घटना स्थळी दाखल झाले आहेत.

या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाच बंब आणि रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. मेकर भवन इमारतीमध्ये बँका आणि इतर महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

(सविस्तर वृत्त थोड्या वेळात)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here