वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार कंपनीला येत्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात टाळेबंदी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये वरच्या स्तरापासून लहान कर्मचाऱ्यांपर्यंतचा समावेश असू शकतो. मस्क आणि ट्विटर यांच्यात करार सुरू असताना अशाच बातम्या समोर आल्या होत्या. ट्विटर आणि मस्कच्या प्रतिनिधींनी या वृत्तावर अद्याप कोणते भाष्य केले नाही. तरी ट्विटर आधीच टाळेबंदी करणार असल्याचे बोलले जात असले तरी मस्क यांची मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आहे. मस्कने यापूर्वीही कंपनीतील टाळेबंदीबद्दल बोलले आहेत. अशाप्रकारे, आगामी काळात ट्विटरवर मोठ्या प्रमाणात टाळेबंदी होऊ शकते आणि सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाऊ शकतो.
पेरोलवर ८०० दशलक्ष डॉलर कपात करण्याची योजना
अहवालानुसार, ट्विटरच्या सध्याच्या व्यवस्थापनाने कंपनीच्या पेरोलवर ८०० दशलक्ष डॉलर कपात करण्याची योजना तयार केली आहे. या संदर्भात, कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या कर्मचार्यांनी म्हटले की त्यांनी मोठ्या प्रमाणात कामावरून कमी करण्याची योजना तयार केली नव्हती, पण कंपनीच्या कागदपत्रांमुळे कर्मचार्यांना काढून टाकणे आणि पायाभूत सुविधांच्या खर्चात कपात करणे भाग पडले.
काय प्रकरण आहे
मस्कने एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ अब्ज डॉलर देऊ केले. मात्र त्यानंतर आपल्या शब्दावर युटर्न घेतला. ट्विटर फेक अकाऊंटची माहिती देत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी यामागे दिला होता. यानंतर ट्विटरने मस्क यांना न्यायालयात खेचले, जिथे डेलावेअरच्या न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना २८ ऑक्टोबरपर्यंत आपापसात हे प्रकरण मिटवण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास त्याची सुनावणी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल.
या दरम्यान, मस्कने पुन्हा ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली असून ही ऑफर प्रति शेअर ५४.२० डॉलर या दराने देण्यात आली आहे. एप्रिलमधील मूळ ऑफरही त्याच किमतीत होती.