UP Crime news: उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये एका दलित तरुणाला तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चोरीच्या आरोपाखाली दलित तरुणाला पकडण्यात आलं. त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आलं.

पीडिताच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. त्याला गावभर फिरवण्यात आलं. या प्रकरणी तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून दोघांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी दिली. तरुण चोरी करण्यासाठी आला होता. तो नशेच्या धुंदीत होता. नेपाळमध्येही त्याला तुरुंगवास घडल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.