couple died in geyser blast: तेलंगणातील हैदराबादमध्ये गिझरच्या स्फोटात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे. लंगर हौज येथील खादर बाग परिसरात ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे गिझरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. स्फोटात पती-पत्नीचा मृत्यू झाला. पती पेशानं डॉक्टर, तर पत्नी एमबीबीएसची विद्यार्थिनी होती.

 

geyser
हैदराबाद: तेलंगणातील हैदराबादमध्ये गिझरच्या स्फोटात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे. लंगर हौज येथील खादर बाग परिसरात ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे गिझरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. स्फोटात पती-पत्नीचा मृत्यू झाला. पती पेशानं डॉक्टर, तर पत्नी एमबीबीएसची विद्यार्थिनी होती. काही महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना दोघांचे मृतदेह सापडले. गिझरचा स्फोट झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. त्यात अनेकांनी प्राण गमावले आहेत.

एका राजकीय नेत्यानं या घटनेची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पती, पत्नीचे मृतदेह बाथरुममध्ये पडलेले होते. निसारुद्दीन (२६) आणि उम्मी मोहिमीन साईमा (२२) यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता. गिझरचा स्फोट शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मालकाच्या मृतदेहाजवळ बसला, गालाला स्पर्श; श्वास तपासला; माकडाचं प्रेम पाहून सारेच गहिवरले
गिझर कशामुळे धोकादायक?
अनेकजण दैनंदिन आयुष्यात गिझरचा वापर करतात. मात्र गिझर जीवघेणा ठरू शकतो. गिझरमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बॉयलरची असते. थंडीच्या दिवसात अनेक जण पाणी जास्त गरम करतात. बऱ्याचदा गिझर सुरू करतात आणि बंद करायला विसरतात. अशा परिस्थितीत गिझर सतत गरम होत राहतो आणि गळतीची समस्या उद्भवते.
संतापजनक! रुग्णवाहिका मिळाली नाही; बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला
बॉयलर तांब्याचं नसल्यास गळतीची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बॉयलरचा स्फोट होतो. त्याचा करंट लागून लोकांचा जीव जातो. गॅस गिझरचा वापर करतानाही समस्या निर्माण होऊ शकते. इलेक्ट्रिकच्या तुलनेत अनेकांना गॅस गिझर सुरक्षित वाटतो. मात्र गॅस गिझरही धोकादायक ठरू शकतो. गॅस गिझरचा वापर सुरू असताना त्यातून कार्बन मोनो ऑक्साईड बाहेर पडतो. त्यामुळे श्वास कोंडू शकतो. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here