मुंबई : आयटी क्षेत्रातील मूनलाइटिंग (Moonlighting) वादाच्या प्रार्श्वभूमीवर आता इन्फोसिस (Infosys) ने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना गिग जॉब्स घेण्याची म्हणजे इतर ठिकाणीही काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता इन्फोसिसचे कर्मचारी एकाच वेळी दोन कंपन्यांमध्ये काम करू शकणार आहेत.

तुम्हीसुद्धा मूनलाइटिंग करण्याचा विचार करताय? साइड इन्कमवर किती भरावा लागतो टॅक्स माहितेय का?
व्यवस्थापकांची परवानगी आवश्यक
आपल्या कर्मचार्‍यांना इन्फोसिस (Infosys) ने अटींसह इतर कंपनीत काम करण्याची परवानगी दिली आहे. इन्फोसिसचे कर्मचारी त्यांचे व्यवस्थापक आणि एचआर (HR) यांची संमती घेतल्यानंतर वैयक्तिक वेळेत दुसऱ्या कंपनीसाठी काम करू शकतील. शिफ्ट दरम्यान कर्मचार्‍यांना दुसर्‍या कंपनीसाठी किंवा इतरांसाठी काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इन्फोसिसचे कर्मचारी शिफ्टनंतर इतर कंपनीत काम करत असतील तर त्यासाठीही एचआर आणि व्यवस्थापकांची परवानगी आवश्यक आहे.

‘सेकंड जॉब’ करणाऱ्यांनो लक्ष द्या! मूनलाइटिंग प्रकरणात TCSने लाखो कर्मचाऱ्यांसाठी मजबूत संदेश पाठवला
ही आहे अट
इन्फोसिस या नोकऱ्यांना ‘गिग’ जॉब (Gig Jobs) म्हणतात. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचारी अर्धवेळ नोकरी करणार आहेत त्यांनी इन्फोसिस आणि तिच्या ग्राहकांशी स्पर्धा करू नये आणि हितसंबंधांचा संघर्ष नसावा, अशीही अट आहे. कंपनीच्या कामावर परिणाम होऊ नये, असेही इन्फोसिसने म्हटले आहे. इन्फोसिसने यासंबंधीची सर्व माहिती कर्मचाऱ्यांना मेलद्वारे दिली आहे.

Wipro कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! आयटी दिग्गज कंपनीकडून वर्क फ्रॉम होम बंदची घोषणा
मूनलाइटिंगला विरोध
विश्लेषकांच्या मते, इन्फोसिसच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळेल. मात्र, इन्फोसिस मूनलाइटिंग (moonlighting) ला समर्थन देत नाही. आयटी कंपन्या सतत मूनलाइटिंग विरोधात बोलत आहेत. मूनलाइटिंमुळे विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर इन्फोसिसनेही अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना इन्फोसिसने स्पष्ट केले होते की, कंपनी मूनलाइटिंगला समर्थन देत नाही आणि गेल्या १२ महिन्यांत अशा पद्धतींसाठी अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

मूनलाइटिंग म्हणजे काय
जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नियमित कामाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे कोणतेही काम करतो तेव्हा त्याला मूनलाइटिंग (moonlighting) म्हणतात. कोरोनाच्या काळात घरातून काम केल्यामुळे मूनलाइटिंग करण्याचा कल वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here