पुणे : राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशात आता दिवाळीतही पाऊस पडणार का? असा प्रश्न सगळेच विचारत आहे. पण परतीचा पाऊस आता ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दिवाळीमध्ये पावसाचं संकट टळणार आहे. पण काही भागांत पाऊस कायम असणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये १० मिमी पाऊसाची शक्यता आहे. तर, इतर भागांत पाऊस राहणार नाही असा अंदाज हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. परतीचा पाऊस लांबल्याने पुण्यासह राज्यातील इतर भागात होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सगळ्यांनाच बसत आहे.

Maharashtra Rain: राज्यात ढगफुटीसदृश्य पावसाचं थैमान, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट
ऐन दिवाळीत पुणे शहरात गेल्या आठवड्याभरापासून रात्रीच्या वेळेस मुसळधार पाऊस होत असून या पावसाने दिवाळीत खरेदीसाठी बाहेर निघालेल्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर याचा फटका हा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना देखील बसला आहे. येत्या दोन दिवसात परतीच्या पाऊस ओसरायला सुरवात होणार आहे. पण राज्यातील काही भागात मात्र पावसाची अशीच स्थितीती राहणार असल्याने पावसातच सर्व सामान्य नागरिकांना दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

राज्यातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी परतीचा पाऊस दोन ते तीन दिवस असाच असणार आहे. तर राज्यातील इतर ठिकाणी परतीचा पाऊस ओसरणार आहे. परतीचा पाऊस हा राज्यातून २५ ऑक्टोबर पासून ओसरणार आहे. म्हणून दिवाळी सगळ्यांची आनंदात जाणार आहे.

भारतीयांनो सावध व्हा! नव्या संकटाची देशात एन्ट्री, यावर उपायही नाही; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here