भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. त्यामुळे क्रिकेटपटूंना प्रचंड प्रसिद्धी मिळते. त्यांच्या भेटीसाठी चाहते वाटेल ते करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र अनेकदा याच चाहत्यांमुळे क्रिकेटपटूंसमोर समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत चाहत्यांना न दुखावता मार्ग काढायचं आव्हान क्रिकेटपटूंसमोर असतं.

मिशन २० टी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. स्पर्धेतील पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. त्यासाठी भारतीय संघ सराव करत आहे. भारतीय संघाचा सराव सुरू असताना काही चाहते तिथे पोहोचले. त्यावेळी विराट कोहली फलंदाजी करत होता. चाहते कोहलीला साद घालू लागले. त्यामुळे कोहलीला फलंदाजी करताना मन एकाग्र करताना अडथळे येऊ लागले.

विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. याच स्वभावामुळे काही वेळा वादही झाले. ऑस्ट्रेलियात सराव करत असलेल्या कोहलीमागे चाहत्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे विराटला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता येईना. अखेर कोहली मागे वळला. आवाज करू नका. माझं लक्षव विचलित होतंय, असं कोहलीनं अतिशय शांतपणे चाहत्यांना सांगितलं.
है तय्यार हम! शाहीन आफ्रिदीचा सामना करण्यासाठी रोहितचा खास प्लॅन, Photo आला समोर
विराटचं म्हणणं चाहत्यांनी ऐकलं. ‘ओके भाई. तुम्ही रिलॅक्स असाल तेव्हा बोलू. किंग तर एकच आहे ना. आम्ही आमच्या किंगसाठी बोलणारच. किंग आहे म्हणून बोलणार,’ असं म्हणत चाहते तिथून निघाले. यानंतर विराटचा सराव सुरुच राहिला. रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातील विराटच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

२३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये भारत वि. पाकिस्तान सामना होईल. गेल्या विश्वचषकात पाकिस्ताननं भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. भारताची आघाडीची फळी शाहीन शाह आफ्रिदीनं उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीनं नाबाद राहत लक्ष्य गाठलं. या दारुण पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here