स्थानिक कमॉडिटी बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव ०.२१ टक्क्यांनी वधारला होता. सोने ४९२५२ रुपयांपर्यंत वाढले. मात्र त्यानंतर त्यात नफावसुली झाली आणि तेजीला ब्रेक लागला. याआधी सोने ४८९५० रुपयांच्या विक्रमी स्तराला गेले होते. कमॉडिटी बाजारात चांदीचा भाव मात्र ०.७५ टक्क्यांनी घसरला. चांदीचा भाव ५२६५० रुपये झाला आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव स्थिर होते. यूएस गोल्ड १८१३.४० डॉलर प्रती औंस आहे. स्पॉट गोल्ड मात्र ७ डॉलरने वधारले आणि स्पॉट गोल्डचा भाव प्रती १० ग्रॅम १८०९.८१ डॉलर झाला.
goodreturns.in या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८९३० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७७६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८९६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८२८० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९८५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९६० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५११८० रुपये झाला आहे. चांदीचा भाव किलोला ५२१३० रुपये झाला आहे.
दरम्यान, कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार जोखीम असणाऱ्या साधनांतून गुंतवणूक माघारी घेऊन सुरक्षित साधनांमध्ये गुंतवत आहेत. त्यामुळे गोल्ड ईटीएफचे आकर्षण वाढत आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या (जानेवारी ते जून २०१९) कालावधीत गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून १६० कोटी रुपये काढून घेतले होते.
वाचा :
गोल्ड फंडांची एकूण संपत्ती जून २०२०च्या अखेरीस दुपटीने वाढून १०,८५७ कोटी रुपयांवर गेली आहे. जून २०१९च्या अखेरीस ही संपत्ती ४,९३० कोटी रुपयांवर होती. हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक भेदरले असून, ते आता सोन्यात गुंतवणूक करू लागले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times