UP Police Encounter: उत्तर प्रदेश पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका एन्काऊंटरचा आहे. एन्काऊंटर दरम्यान गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र व्हायरल व्हिडीओमधून वेगळाच प्रकार समोर आला आहे.

लखीमपूर खिरी जिल्ह्यातील हैदराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी १९ ऑक्टोबरला रात्री साडे आठच्या सुमारास विनीत शर्माचा एन्काऊंटर केला. त्याच्या पायात ९ मिमीची गोळी लागल्याचं सांगण्यात आलं. मात्र व्हायरल व्हिडीओत दिसणारं चित्र वेगळं आहे. गुन्हेगार जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. त्याच्या हातात एक पिस्तुल आहे. काही वेळात शर्मा उठतो आणि चालू लागतो. शर्माच्या पायाला गोळी लागल्याचं पोलीस सांगत असताना तो उठून उभा राहतो आणि चालू लागतो.
उत्तर प्रदेश पोलीस दलात काम केलेले माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्यासह अनेकांनी एन्काऊंटर बोगस असल्याचं म्हटलं. हा कसला एन्काऊंटर, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणतीच दुखापत नाही. रक्तस्राव नाही. आरोपी आरामात उठला अन् चालू लागला. उत्तर प्रदेशात बोगस एन्काऊंटर राज सुरू आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.