Mumbai Crime News: महिलेकडून तीन वर्षांच्या चिमुकल्याला खेचून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला टाऊनशिपमध्ये वास्तव्यास असलेल्या दिप्ती चंद्रकांत जोशी (३९) बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास रस्त्यावरून चालत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा ३ वर्षांचा मुलगा होता. यावेळी तिघांनी त्यांच्याकडून मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न जोशी यांनी हाणून पाडला.

 

kandivali women
मुंबई: महिलेकडून तीन वर्षांच्या चिमुकल्याला खेचून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला टाऊनशिपमध्ये वास्तव्यास असलेल्या दिप्ती चंद्रकांत जोशी (३९) बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास रस्त्यावरून चालत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा ३ वर्षांचा मुलगा होता. यावेळी तिघांनी त्यांच्याकडून मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न जोशी यांनी हाणून पाडला.

या प्रकरणी समता नगर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मुलाला खेचण्याचा प्रयत्न करणारे तृतीयपंथी असल्याचा दावा जोशी यांनी केला. ‘मी मुलाला घेऊन प्री-नर्सच्या प्रवेशासाठी गेले होते. तिथून परतत असताना तीन तृतीयपंथीयांनी मला रोखलं. त्यांनी मला माझ्या मुलाला त्यांच्याकडे देण्यास सांगितलं. मी त्यांना नकार दिला. त्यावेळी त्यांनी मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला,’ असा घटनाक्रम जोशी यांनी सांगितला.
VIDEO: भयंकर! डेंग्यूच्या रुग्णांना प्लाझ्माच्या जागी मोसंबीचा ज्युस चढवला अन् मग…
दोघांनी माझे हात धरले आणि तिसऱ्या तृतीयपंथीयानं माझ्याकडून मुलाला हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आठ-नऊ माझ्या कानशिलात लगावली. आम्ही काहीही करू तुझ्या मुलाला नेऊ, असं ते तिघे म्हणत होते. एकानं माझे केस खेचले. मला फरफटवले. पण मी मुलाला घट्ट धरून ठेवले. त्यानंतर मी आरडाओरडा केला. सुदैवानं दोन-तीन जणांनी आवाज ऐकला आणि मदतीसाठी धाव घेतली. त्यांना पाहून तिघे पळून गेले. मी त्या तीन तृतीयपंथीयांना पहिल्यांदाच पाहिलं. माझ्या चेहऱ्याला इजा झाली. पण मी माझ्या मुलाला वाचवण्यात यशस्वी ठरले, असं जोशी म्हणाल्या.
निकितापासून लांब राहा! इन्स्टा स्टोरीवरून वाद, एक्सची तरुणाला जबर मारहाण, कानाचा पडदा फाटला
समता नगर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. ‘त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र आम्ही आसपासचे सीसीटीव्ही तपासत आहोत. तक्रारदार महिलेनं तीन आरोपींचं वर्णन केलं. ते तिघे तृतीयपंथीय असल्याचा दावा केला. पण ते खरेच तृतीयपंथीय होते याबद्दल आम्हाला शंका आहे,’ असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here