विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार राज्यस्तरीय जलतरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, ऑलंपिक वीर वीरधवल खाडे, सुयश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादीमुळे अनेक संस्थांचे चेअरमन पद मिळाले आहे. कोणत्याही संस्थेचे होत असलेली विकासकामे कमी बजेटमध्ये होणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय जलतरण तलावाचे बजेट सात कोटी पेक्षा अधिक होते, मात्र यामध्ये काटकसर करून हा केवळ पाच कोटीत उभारला आहे. तरीही गुणवत्तेत तडजोड नाही. मतदार संघातील विकासकामासाठी सर्व क्षेत्रातील आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत, म्हणून तिकडे अशीच टीम तयार करू, बारामतीप्रमाणे तेथेही सुविधा देऊ, असेही अजित पवार म्हणाले.
‘मला डबा बांधून वरून फेकून द्यायचे’
मला लहानपणी पाण्याची फार भीती वाटत असे. त्यामुळे मी दुरूनच सर्वांची मजा पाहत असे. पण मला डबा बांधून वरून फेकून द्यायचे, मला भीती वाटायची की, डब्याचा दोर तुटला तर काय होईल, मात्र आमच्या वरिष्ठांना काही वाटायचे नाही. ते वरून खाली फेकून द्यायचे. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असे वागत असल्याचे अजित पवारांनी शरद पवारांचे नाव न घेता सांगितले आहे.