खरंतर, हे प्रकरण पश्चिम बंगालमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी इथल्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी तिचं रक्त विकण्यासाठी बालूरघाट जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत पोहोचली. तिथे ती अधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला हे का करायचे आहे, याचं कारण विचारलं. यानंतर जेव्हा त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.
किस्सा ऐकल्यावर सर्वांनाच झालं आश्चर्य…
संबंधित मुलीला स्वतःसाठी स्मार्टफोन घ्यायचा होता पण तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने स्वतःचे रक्त विकायचं ठरवलं. मुलीने स्वत: सांगितलं की, तिने एका नातेवाईकाच्या फोनवरून स्वत:साठी ऑनलाइन मोबाइल मागवला आहे. पण आता भरण्यासाठी पैशांची गरज आहे. मुलीने तिचे नाव बदलून तिच्या घरापासून ३० किमी अंतरावर रुग्णालयात गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात आणि आई गृहिणी आहे. सध्या या घटनेनंतर रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी चाइल्डलाइनला ही माहिती दिली. यानंतर या मुलीचे समुपदेशन करून तिला जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत तिच्या पालकांकडे पाठविण्यात आले.