औरंगाबाद : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. सततच्या पावसामुळे शेतकर्यांचं तर मोठं नुकसान झालंच आहे अशात नदी-नाल्यांना पूर आल्याने नागरिकांचंही जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सगळ्यात औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
गावांत स्मशानभूमि नसल्याने गावाशेजारील अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र, मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने अंत्यसंस्कार पार पडला.