uddhav thackeray news today live, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, कार्यकर्त्यांनी थेट पाठवला सामूहिक राजीनामा – shivsena uddhav thackeray news chandrapur workers submitted their collective resignation
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामा थेट उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. या सामूहिक राजीनाम्याने चंद्रपुरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पक्षाचे कार्य करण्यासाठी जे सक्षम नाहीत त्यांना काढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यातूनच हे राजीनाम्याचे नाट्य घडले आहे. जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी आणि वरोरा तालुक्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे
शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली. शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. राज्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते स्वतःकडे ओढण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र राज्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. शिंदेंची गद्दारी कळताच उद्धव ठाकरेंची कशी झालेली अवस्था? आदित्यनी ‘मटा कॅफे’त सांगितला प्रसंग
शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. काही शिवसैनिकांनी रक्ताने पत्र लिहून मी शिवसैनिकच हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुखासहित कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सामूहिक राजीनामा पाठविला आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यात ६ जिल्ह्यांवर अस्मानी संकट, ‘या’ तारखेपर्यंत यंदाचा मान्सून घेणार निरोप मागील वर्षी शिवसेना तालुका प्रमुखपदी नरेंद्र नरड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिवसेना सत्तेत असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यात कुणीही मदत करायला तयार नव्हतं. संघटन वाढीसाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठ पदाधिकार्यांनी आमच्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं, असा आरोप करत आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा सादर केला आहे. या राजीनाम्यावर पक्ष प्रमुख काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.