Live अपडेट्स…>> मी भाजपत जाणार नाही, मात्र लोकांसाठी काम करणे सुरू ठेवेन- सचिन पायलट>> मी भारतीय जनता पक्षात जाणार नाही- सचिन पायलट यांची भूमिका- एएनआयने दिले वृत्त.
>> कालच्या संपूर्ण घटनाक्रमात आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे सचिन पायलट यांनी आभार मानले आहेत. ट्विट करत त्यांनी समर्थनासाठी पुढे आलेल्या लोकांना धन्यवाद. राम राम सा, असे लिहिले.
>> आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.
>> राजस्थानच्या राजकीय वर्तुळाचे, तसेच देशाचे आज सचिन पायलट काय भूमिका घेणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
>> मंगळवारी राजस्थान प्रदेशाध्यक्षपदी पायलट यांच्या जागी ओबीसी नेते गोविंदसिंह डोटासरा यांची नियुक्ती करण्यात आली.
>> मुख्यमंत्री गहलोत यांनी सचिन पायलट यांचे समर्थक मंत्री विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांनाही मंत्रिपदावरून दूर केले.
>> काल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राजस्थान संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बंडखोर नेते सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून दूर केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times