पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुजरातमधील भेसळयुक्त बर्फी विक्रीस पाठविण्यात येत असल्याचा प्रकार अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) उघडकीस आणला. शहरातील विविध मिठाई विक्री दुकानांवर ‘एफडीए’ने छापे टाकून पाच लाख ९० हजार रुपयांचा भेसळयुक्त बर्फीचा साठा जप्त केला.

गुजरातमधून अशोक राजाराम चौधरी याच्या गाडीतून भेसळयुक्त बर्फी विक्रीस पाठविण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’च्या पथकाला मिळाली. गुजरात बर्फी, स्वीट हलवा, रिच स्वीट डिलाइट, स्वीट हलवा (ब्रीजवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी असे मिठाईचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवार पेठेतील अग्रवाल स्वीट मार्ट, कोंढवा परिसरातील कृष्णा डेअरी फार्म, गहुंजे, देहू रस्ता, बालेवाडीतील हिरासिंग रामसिंग पुरोहित येथील मिठाई विक्री दुकानांत भेसळयुक्त बर्फी मागविण्यात आल्याचे उघडकीस आले. मिठाईचे नमुने अन्न तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशः गावी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’कडून तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मिठाई, रवा, मैदा, बेसन, खाद्यतेल, वनस्पती तूप, फरसाण असे सत्तर अन्न पदार्थ तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्यांचा पुर्नवापर केल्याचे आढळून आले. तीन ठिकाणी कारवाई करून चार लाख ५१ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. शीतगृहात साठवलेला मटार, मिठाई, तूप, खवा असा पाच लाख १० हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

मिठाईच्या बॉक्सवर मुदतीचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. मिठाईसाठी भेसळयुक्त खव्याचा वापर केल्याचे आढळल्यास कारवाईचा इशारा प्रशासानाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here