कोणाला तोटा, कोण लाभार्थी
व्यापारातील अस्थिरतेच्या दरम्यान जागतिक बाजारपेठेत घसरण होऊनही, कंपन्यांचे चांगले आर्थिक परिणाम आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) अनेक सत्रांनंतर केलेल्या खरेदीमुळे गुरुवारी बाजारात तेजी राहिली. अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एचयूएल आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स हे शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. दुसरीकडे, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, डिव्हिज लॅब्स, अदानी पोर्ट्स आणि यूपीएल हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले.
आठवड्यात गुंतवणूकदारांची कमाई
बीएसईवर (बॉम्बे स्टॉक एक्शचेन्ज) सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप १७ ऑक्टोबर रोजी २,७१,७४,७५७.२१ कोटी रुपये होते, जे आतापर्यंत ४.७९ लाख कोटी रुपयांनी वाढून २,७६,५४,४६७ कोटी रुपये झाले आहे.
अॅक्सिस बँक शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात ९.०३ टक्क्यांच्या वाढीसह ९००.४० रुपयांवर बंद झाले. तसलेच कोटक महिंद्रा बँकेचे समभाग २.१० टक्के, आयसीआयसीआय बँक २.०८ टक्के, एचयूएल २.०४ टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स १.९१ टक्के, अपोलो हॉस्पिटल १.५४ टक्के मजबूत दिसले.
अॅक्सिस बँकेच्या भागधारकांची चांदी
दुपारच्या व्यापारात तीव्र विक्रीनंतर ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स खरेदीपासून १०४.२५ अंकांनी किंवा ०.१८ टक्क्यांनी वाढून ५९,३०७.१५ वर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँकेचा शेअर सर्वाधिक ८.९६ टक्क्यांनी वाढला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी होती?
इतर आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँग सेंग आणि जपानचा निक्केई घसरला, तर चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक वाढीसह बंद झाला. सुरुवातीच्या व्यापारात युरोपमधील प्रमुख बाजारपेठा घसरणीच्या स्थितीत होत्या. अमेरिकन शेअर बाजार वॉल स्ट्रीट गुरुवारी घसरणीने बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.३७ टक्क्यांनी घसरून ९२.०२ डॉलर प्रति बॅरलवर आले.