मुंबई : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. गेल्या वर्षी दिवाळी २०२१ रोजी अदानी समूहाच्या ६ कंपन्या लिस्ट झाल्या होत्या. यापैकी तीन कंपन्यांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स-निफ्टीची आगेकूच, या आठवड्यात गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
या कालावधीत अदानी पॉवरने गुंतवणूकदारांना तीनपट रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेसने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. इतकेच नाही तर अगदी खराब कामगिरी करणाऱ्या अदानी ग्रुपच्या अदानी पोर्ट्स अँड सेझने (एपीएसईझेड) देखील गेल्या दिवाळीपासून जवळपास १३ टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी दिवाळी ४ नोव्हेंबरला होती आणि तेव्हापासून सेन्सेक्स- निफ्टीत जवळपास एक टक्का घसरण झाली आहे.
मुहूर्ताच्या सौद्यांकडून मोठ्या अपेक्षा; जाणून घ्या त्याचे महत्त्व, मुहूर्ताला नेमकं काय होणार
इतर २ कंपन्यांची कामगिरी पहा
अदानी ग्रुपच्या इतर दोन कंपन्यांनी अदानी ग्रीनने गेल्या दिवाळीपासून ७६.७२ टक्के आणि अदानी ट्रान्समिशनला ७१.८८ टक्के दिले आहेत. अदानी ग्रुपची आणखी एक कंपनी अदानी विल्मर शेअर्स देखील बाजारात सूचीबद्ध आहेत, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने दोन सूचीबद्ध सिमेंट कंपन्या – SCC आणि अंबुजा सिमेंट्स- विकत घेतल्या आहेत.

Delhivery शेअर्सचे बुरे दिन! पोचला विक्रमी नीचांकीवर, गुंतवणूकदारांची बुड-बुडघागरी

गुंतवणूकदारांनी काय करावे

अदानी पोर्ट्स कव्हर करणार्‍या २२ विश्लेषकांपैकी कोणालाही विक्रीचा सल्ला दिला नाही. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपली लक्ष्य किंमत रु. ८१० वरून रु. ९०० पर्यंत वाढवली आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार कंपनीच्या शेअरची सरासरी लक्ष्य किंमत ९१३ रुपये आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा १३ टक्क्यांनी जास्त आहे. दुसरीकडे अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस यापैकी कोणत्याही विश्लेषकाने कव्हर केलेले नाही. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीजने अलीकडेच अदानी टोटल गॅसला दीर्घकालीन नफ्यासाठी होल्ड रेटिंग नियुक्त केले आहे. कंपनीने पुढील २४ महिन्यांसाठी ३,४७५ रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे, जी सध्याच्या बाजारभावापेक्षा फक्त सहा टक्के जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here