पुणे : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘मटा ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर पलटवार करत आता राणे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राचा स्तर घसरलेला नाही, जे बोलत आहेत त्यांच्याच राजकारणाचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचे राजकारण चांगले आहे. राजकारणाचा स्तर घसरला वगैरे असं मला वाटत नाही, अशा शब्दांत नारायण राणे ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विविध नेत्यांना लक्ष्य केलं. तसंच आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे या आपल्या दोन मुलांच्या भाषेवरून होत असलेल्या टीकेवरही भाष्य केलं. ‘तुम्हाला भास्कर जाधव यांची भाषा आवडते, पण फक्त माझी मुलंच दिसतात का? माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिले तर ते दिसते, पण बाकीचे लोक काय बोलतात हे मीडियाला दिसत नाही का? माझ्या मुलांविषयी बोलायला मी इथे आलो नाही,’ असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंचं पुढचं टार्गेट ठरलं, शिंदे समर्थक भरत गोगावलेंच्या कट्टर विरोधक ‘मातोश्री’वर

‘ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांपैकी ४ जण मझ्या संपर्कात’

शिवसेनेतील फुटीनंतर ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं, तर १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. मात्र या १५ पैकी बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाण्यास उत्सुक असून चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here