चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत अनेक वास्तू उभ्या आहेत. चंद्रपूरच्या इतिहासात भर टाकणारी घटना गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा येथून पुढे आली आहे. वटराणा येथील नितेश मेश्राम यांना शोषखड्ड्यासाठी खोदकाम करताना दोन चांदीची नाणी सापडली आहेत.

धनत्रयोदशीला महाराष्ट्राला मुघलकालीन खजिना सापडला, खड्डा खोदताना घबाड हाती
हेही वाचा-शेतकरी रोपटं लावत होता, कुदळ मारताच हाती आला ५ व्या शतकातील खजिना
ही नाणी चांदीची असून त्यांचं वजन ११ ग्रॅम आहे. या नाण्यांवर फारसी भाषेत कलमा लिहिलेल्या आहेत. मेश्राम यांनी ही नाणी जपून ठेवली आहेत. मेश्राम यांनी इतिहास प्रेमी निलेश झाडे यांना ही नाणी दाखवली. झाडे यांनी इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला.
फारसी भाषेत लिहिलेल्या कलमांचे अशोक सिंह ठाकूर यांनी वाचन केले. ही नाणी मुघल बादशाह अकबर आणि औरंगजेबाची असल्याचे त्यांनी सांगितले. या नाण्यांचा काळ १५ आणि १६ वे शतक आहे. गोंडपिपरी तालुका हा मुघलांच्या ताब्यात होता. वटराणा येथे त्या काळात मोठी वसाहत असावी. या भागात संशोधन झाल्यास मुघल काळातील इतिसावर प्रकाश पडू शकतो, अशी शक्यता इतिहासकारांनी वर्तविली आहे.

धनत्रयोदशीला महाराष्ट्राला मुघलकालीन खजिना सापडला, खड्डा खोदताना घबाड हाती
हेही वाचा-पृथ्वीचा आकार बदलतोय, कारण दडलंय भारताच्या गर्भात; शास्त्रज्ञांची झोप उडाली
नाण्यांवर काय लिहिलेलं आहे?
गोलाकार आसलेलं चांदीचं नाणं औरंगजेबाचं आहे. या नाण्यावर फारसी भाषेत “सिक्का ज़द दर जहान चु बद्रे मुनिर. शाह औरंगजेब आलम गिर. हिजरी सन ११११”, असं लिहीलं आहे. तर, चौकोणी नाणं अकबराचं आहे. त्यावर अकबराचं नाव कोरलेलं आहे. हिजरी सन ९९३ लिहीले आहे.
हेही वाचा-बापरे! ८ डिसेंबरला पृथ्वीवर एलियन्स उतरणार, या व्यक्तीच्या दाव्याने जगभरात खळबळ
फक्त मुरजी पटेलच नाही, तर आणखी २३ उमेदवार ऋतुजा लटकेंविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत