bhaskar jadhav news today, भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, घराच्या परिसरात सापडल्या धक्कादायक वस्तू – attack on bhaskar jadhav house took a different turn shocking things were found in the area of the house
रत्नागिरी : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांच्या ७ पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात मोठी माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. या हल्ला प्रकरणाचा तपास सगळ्या बाजूने लक्षात घेऊन युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संवेदनशील विषय असल्याने व तपासावर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी तपासातील कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून दिली गेली नाही.
शहरातील पाग भागातील आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोल भरलेली बाटली, स्टॅम्प व दगड आढळले. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते चिपळूण पोलीस ठाण्यावर जाऊन संशयितांना ताब्यात घ्या अशी मागणी केली होती. या प्रकरणी भास्कर जाधव यांचे सुपूत्र समीर जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात आठ ते दहा संशयितांची नावे आहेत. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. तसेच जाधव यांच्या समोरील पाग परिसर, बाजारपेठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, कार्यकर्त्यांनी थेट पाठवला सामूहिक राजीनामा
चिपळुणमधील तणाव निवळला असला तरी या प्रकरणी पोलीस तपासाबाबत मोठी उत्सुकता आहे. पोलिसांनी संशयितांचे जाबजबाब नोंदवले आहेत. संशयितांचे मोबाईलही तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या हल्ल्याचे धागेदोरे मिळविण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे. दरम्यान, भाजपने जाधव यांची सुरक्षा काढल्याने वाय प्लस सुरक्षा पुन्हा मिळावी, यासाठी हे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, श्वान पथक गुरुवारी रात्री चिपळुणात दाखल झाले. भास्कर जाधव यांच्या घरापासून ५० मीटर वरच घुटमळले आहे. काही ठसेदेखील पोलिसांनी घेतले आहेत. या प्रकरणाचा तपास चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी करीत आहेत.