Six Stones In Oesophagus : गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील लटोरी या गावातील एका चार महिन्याच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत ६ खडे अडकले असल्याचे समोर आले.

हायलाइट्स:
- चार महिन्याच्या मुलीच्या अन्न नलिकेत चार ते पाच एमएमचे ६ खडे
- मुलीचे एक्सरे काढले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला
- गोंदिया सालेकसा तालुक्याच्या लटोरी गावातील धक्कादायक प्रकार
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील लटोरी या गावातील एका चार महिन्याच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत ६ खडे अडकले असल्याचे समोर आले. चिमुकलीला खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने तिच्या पालकांनी तिला गोंदियातील एका डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेले असता, मुलीचे एक्सरे काढले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी या मुलीची शस्त्रक्रिया करुन हे खडे काढण्याचे ठरवले. डॉ. विकास जैन यांच्या रुग्णालयात या चिमुकलीला दाखल करण्यात आले आहे. डॉ. विकास जैन आणि त्यांचे इतर सहकारी डॉ. यांनी या चार महिन्यांच्या मुलीची शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेत अडकलेले ६ खडे ऑपरेशन करत बाहेर काढले आहे.

चार महिन्यांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत तब्बल ६ खडे; डॉक्टरांसह सर्वच हैराण, गूढ वाढलं
या घटनेबद्दल डॉक्टरही अवाक् झाले आहेत. हे खडे बाहेर निघताच सर्वांनाच एक धक्का बसला. सध्या या मुलीची प्रकृती स्वस्थ आहे. तर, चार महिन्याची मुलगी साधा भिस्किटसुद्धा खाऊ शकत नसताना, तिच्या अन्ननलिकेत हे ६ खडे मिळाल्याने डॉक्टरांनी या संदर्भात सालेकसा पोलिसांना माहिती दिली आहे. दरम्यान, मुलीची हत्या करण्यासाठी तिच्या तोंडात कुणी तरी खडे तर घातले नाही ना याचा तपास आता पोलीस करत आहेत.

चार महिन्यांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत तब्बल ६ खडे; डॉक्टरांसह सर्वच हैराण, गूढ वाढलं
राजकीय नेत्यांचे फोटो असलेल्या आकाश कंदीलाची वाढती मागणी ; आवडत्या पक्षाप्रमाणे कंदीलाची खरेदी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.