मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडत भाजपासोबत राज्यात नवं सरकार स्थापन केलेय. यावेळी शिवसेनेचे ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलाय. यानंतर सेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झालेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या गटातील मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का दिला आहे. यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलेय. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे ठाकरेंकडून देशमुख यांना बळ दिले जात आहे. दरम्यान, देशमुख यांच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेशानंतर शिवसेना प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे येत्या काही दिवसात पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे शेवटी…
दरम्यान, आता शिंदे गटातील अकोल्याचे माजी आमदार तथा शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांनी एक विधान केलं आहे. जर उद्धव ठाकरे साहेब पोहरा देवी जात असतील, आणि अकोला शिवनी विमानतळ त्यांचं आगमन झाल्यास यावेळी त्यांचे निश्चित स्वागत केले जाईल. बाजोरिया पुढे बोलतांना म्हणाले की ते नेते आहेत, कारण एवढ्या मोठ्या नेत्याला नेते नाहीत, असं म्हणता येणार नाही. परंतु भविष्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन अन् चळवळ नेत असताना त्यावेळी माणसाचे वेगवेगळे विचार होऊ शकतात. बाळासाहेबांनी जी चळवळ निर्माण केली होती, ती चळवळ त्यांच्यामध्ये दिसत नव्हती. म्हणून त्यावर आम्ही विचार करू, पण नेते तर आहेस ना महाराष्ट्राचे. कारण लहान माणूस नाहीये, त्यामुळे यात काही शंका नाहीये.
दरम्यान, बाजोरिया यांना अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यावर योग्य वेळेवर योग्य विचार करू, परिस्थिती मुंबई अथवा बाहेरगावी असेल तर त्यांचं स्वागत करता येणार नाही. अकोल्यामध्ये जर असेल तर नक्कीच स्वागत करण्यामध्ये काही वैर नाहीये, राहुल गांधी का असेना, शेवटी नेते आहेत. त्यांची विचारधारा वेगळी असू शकते, परंतु स्वागत आणि विचारधारा, विकास यामध्ये फरक करू शकतोय, असेही ते म्हणाले.