मेलबर्नमध्ये आज साजरी होणार दिवाळी! पाकिस्तानविरुद्ध फटकेबाजी करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

हवामानाचा अंदाज काय आहे?
वेदर डॉट कॉमनुसार, रविवारी दिवसभरात पावसाची शक्यता कमी आहे. या काळात ढगाळ वातावरण राहील. मात्र, संध्याकाळनंतर हवामानात बदल दिसून येत आहे. भारतात जरी तुम्ही हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून पाहत असाल, पण त्यावेळी मेलबर्नमध्ये संध्याकाळी ७ वाजले असतील. रात्री पावसाची कमाल २४ टक्के शक्यता आहे.
आफ्रिदीच नाही तर हे पाकिस्तानी खेळाडूही उडवणार टीम इंडियाची झोप, विजय मिळवणं कठीण?
मेलबर्नमधील वेळा | पावसाचा अंदाज |
संध्याकाळी ७ वाजता | २ टक्के |
रात्री ८ वाजता | ४ टक्के |
रात्री ९ वाजता | ४ टक्के |
रात्री १० वाजता | १४ टक्के |
रात्री ११ वाजता | २४ टक्के |

IND vs PAK: मोहम्मद शमी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, हे काय बोलून गेला दिग्गज क्रिकेटपटू?
पावसामुळे सामना रद्द झाल्यास….
आयसीसीने पहिल्या फेरीसाठी आणि सुपर-१२ साठी राखीव दिवस ठेवलेला नाही. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. थोडा वेळ पाऊस पडल्यास षटके कमी करता येतात. किमान पाच-पाच षटके खेळता येतील.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत.
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
टी-२० वर्ल्ड कपमधला सर्वात धक्कादायक निकाल, दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेला संघ
स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
पाकिस्तानः
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जाम.
राखीव: मोहम्मद हरीस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.